मिरज प्रतिनिधी नजीर शेख : कोव्हिड आणि नॉन कोविड रुग्णाच्या सहाय्यते साठी स्थापन करण्यात आलेल्या “मिरज कोरोना रुग्ण सहायय व समन्वय समिती मिरज” ला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी आज रुग्ण समितीला दिले.
रुग्ण समिती तर्फे आयुक्त यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी आयुक्त नितीन कापडणीस यांनी मिरज कोरोना रुग्ण सहायय व समन्वय समितीचा उपक्रम चांगला असून लोकांच्यात जागृती करण्याबरोबरच, रुग्णांना याचा नक्की उपयोग होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
मिरज कोरोना रुग्ण सहाय्य व समन्वय समितीचे संतोष माने, पत्रकार रवींद्र कांबळे, पत्रकार राजेंद्र कांबळे, मुस्तफा बुजरूक, सचिन गाडवे, प्रितेन असर आणि सूधीर गोखले हे यावेळी उपस्थित होते.
कोव्हिड-१९ रुग्णांच्या सहाय्यतेसाठी ही समिती काम करणार असून, नागरिक आणि रुग्णांच्यामध्ये कोरोनाविषयीची जनजागृती केली जाणार आहे. ऑक्सीजन सेंटर सुरु करण्यात येणार असून रुग्णांना पोर्टेबल ऑक्सीजन मशिन उपलब्ध केले जाणार आहेत. त्याचबरोबर कॉल सेंटर सुरु करून रुग्णांना सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याच बरोबर रुग्णांना विविध रुग्णालयातील बेड याची माहिती उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
रुग्णांच्यातून कोव्हिड विषयीची भिती व गैरसमज दूर केले जाणार आहे. या बाबत सा. मि. कु. महापालिकेने रुग्ण समितीला आवश्यक ते सहकार्य करण्याबाबतच्या मागण्यांचे निवेदन आज सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिले.