मराठा महासंघ स्वयंरोजगार शिबिरास प्रतिसाद

अखिल भारतीय मराठा महासंघ महिला आघाडीच, मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्या वतीने महिला दिनाच्या औवचित्य साधून महिलांसाठी महिला स्वंयरोजगार प्रशिक्षण शिबिर मोफत आयोजित केले होते यावेळी महिलांना फिनेल, वॉशिंग पावडर, लिक्विड सोप, अगरबत्ती, सेंट व इतर वेगवेगळ्या लघु उद्योगांचे प्रशिक्षण प्रशिक्षिका सौ.गंधाली सुहास दिंडे, महाराष्ट्र शासन पुरस्कृत उद्योजकता विकास केंद्र
यांनी प्रात्यक्षिकसह दिले. याप्रसंगी उद्योगातून महिलांनी सक्षम बनावे असे बोलून राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी भावी काळात महिलांनी व्यवसायात भरारी मारावी यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली यावेळी सौ.गंधाली दिंडे यांनी रोजगार पूरक प्रशिक्षण घेवून स्वतःच्या पायावर उभे राहून
आत्मनिर्भर व्हावे असे सांगितले, सौ सविता पाटील सदस्या,प्रिन्स शिवाजी बोर्डींग यांनी मनोगत व्यक्त केले स्वागत दिपा डोणे यांनी प्रास्तविक महिला अध्यक्ष शैलजा भोसले यांनी केले, शिबीरास १००पेक्षा जास्त महिलांच्या उपस्थितीने चांगला प्रतिसाद मिळाला आभार
संयोगिता देसाई यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *