०८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याच महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना व भगिनी मंचच्या वतीने “अभिमान मातेचा, सन्मान मुलींचा” हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मुलींचा जन्मदर वाढवणे, बेटी बचाओ आणि मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढवणे, मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा व भगिनी मंच अध्यक्षा सौ.वैशाली राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. महिला दिनानिमित्त शिवसेना शहर कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
सौ.ज्योती निलेश हंकारे, सौ.दिशा ऋतुराज क्षीरसागर, शिवसेना महिला आघाडी शहरसंघटक सौ.मंगल साळोखे, श्रीमती पूजाताई भोर, सौ.पूजा कामते, सौ.शाहीन काझी, सौ.गौरी माळदकर, सौ.अनुराधा परमणे, सौ.मीनाताई पोतदार, सौ.मंगलताई कुलकर्णी, सौ.भारती गवळी
महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिला दिनानिमित्त शिवसेना भगिनी मंच तर्फे “अभिमान मातेचा, सन्मान मुलींचा” उपक्रम

Read Time:1 Minute, 36 Second