शाश्वत प्रतिष्ठानच्यावतीने महिलादिनाच्या निमित्ताने परिवर्तनवादी सामाजिक कार्यकर्त्या दिपा शिपुरकर यांचा सत्कार शाश्वत प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ गुरुदत्त म्हाडगुत आणि उपाध्यक्ष राहुल चौधरी यांचे हस्ते ग्रंथ आणि फुलझाडाचे रोप देऊन करण्यात आला. एड्स नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, अमन फाऊंडेशन आॅटीझम करीता काम करणार्या संचालिका, प्राणीमित्र, वृक्षारोपण वृक्षासंवर्धन, कोल्हापूर थुंकी मुक्त अभियान यासह सामाजिक वंचिताना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असणार्या दिपा शिपुरकर यांचा सत्कार शाश्वत प्रतिष्ठानचे वतीने करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ गुरुदत्त म्हाडगुत, उपाध्यक्ष राहुल चौधरी,रेशन व्यापारी संघटनेचे जिल्हा ध्यक्ष रवींद्र मोरे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे करवीर तालुका अध्यक्ष तुकाराम जांभळे, प्रतिष्ठानचे सेक्रेटरी निलेश कांबळे ,संचालक संतोष परब, संदीप जाधव, अविनाश टकळे, अजय पाटील, निखिल जाधव, योगेश पोवार,पल्लवी देशपांडे, शिल्पा अष्टेकर, मनीषा माने यांच्या सह सदस्य उपस्थित होते
महिलादिनाच्या निमित्ताने शाश्वत प्रतिष्ठानच्यावतीने परिवर्तनवादी सामाजिक कार्यकर्त्या दिपा शिपुरकर यांचा सत्कार

Read Time:1 Minute, 49 Second