महिला दिनानिमित्त महालक्ष्मी सखी मंच आनुवंशिक विकारांचे निदान करणारे शिबीर उत्साहात …

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोल्हापुरात थायरॉईड, रक्तघटक तपासणीसह अनुवंशिक विकारांचे निदान करणाऱ्या इलेक्टरोफेरोसिस चाचण्या आणि नेत्र तपासणी शिबिराचा पश्चिम महाराष्ट्रातील पहिलाच मोफत उपक्रम राबविण्यात आला. महालक्ष्मी सखी मंचच्या पुढाकाराने समवेदना मेडीकल फौंडेशन , हिंद लॅब आणि नंदादीप नेत्रालय यांच्या संयुक्त सहभागाने साईक्स एक्सटेन्शन परिसरात झाला. आडीचशेहून अधिक महिला भगिनींनी या उपक्रमाचा लाभ घेतला. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस विजय जाधव , महिला आघाडी जिल्हाध्यक्षा कु. गायत्री राऊत , पाककलातज्ञ सौ.संगीता देवकर , हाजी अब्दूलमजिद जमादार ,सौ.हाजी दिलशाद जमादार , सामाजिक कार्यकर्ते संजय पटकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचा शुभारंभ झाला. महालक्ष्मी सखी मंचच्या अध्यक्षा सौ. जस्मिन जमादार , सामाजिक कार्यकर्ते आजम जमादार , झाकिरभाई जमादार, समवेदना फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बरकत पन्हाळकर,नंदादीप नेत्रालयाचे डॉ. शुभम चव्हाण ,महालॅबचे तुषार पाटील आणि सुरेश पाटील आणि श्रीमती छाया साळुंखे , दिपाली समुद्रे , स्मिता गायकवाड, रेखा राजगुरू , एजाज शिकलगार, युवराज पाटील , आय्याज शेख , नवाब शेख, युसूफ जमादार, नजीर जमादार,मुस्कान जमादार, सौ.आरिफा जमादार , सौ.सफूरा जमादार ,सौ.तरन्नुम जमादार यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *