अधीसभेमध्ये सदर बाबीची गांभीर्याने दखल घ्यावी. फडके प्रकाशनाने आजपर्यंत विद्यार्थी व महाविद्यालयांना वितरीत केलेल्या सुपर गाईड व क्रमिक पुस्तकांच्या षडयंत्राने सबंध महाराष्ट्र हादरून गेला आहे.संभाजी ब्रिगेड ने ही बाब समोर आणली व आमदार भाई जयंत पाटील साहेब यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्याने कारवाई होईलच.
शिक्षणातून (आयक्यू) बुद्ध्यांक वाढतो असे म्हटले जाते पण फडके प्रकाशन आणि व त्यांच्यासह इतर काही प्रकाशकांनी ज्या पद्धतीने इतिहासाची मांडणी केलेली आहे त्या पद्धतीवरून समाजातील आजचे चित्रण बघता, अभ्यासक्रमाच्या वेळीच विद्यार्थ्यांना स्फूर्ती प्रेरणा मिळण्याऐवजी कौटुंबिक वाद, सत्तेसाठी संघर्ष, वारसा हक्कासाठी वादावादी, राष्ट्रीय हितापेक्षा स्वहित अशा पद्धतीचे चित्रण जे समाजात दिसत आहे त्यासाठी जबाबदार फडके प्रकाशनाची रद्दी पुस्तके आहेत. ही पुस्तकं वाचल्यानंतर आपल्याला हे जाणवेल कि या पुस्तकातून पावलोपावली पराक्रम ऐवजी कट कपटकारस्थान हेच मराठ्यांच्या इतिहासाचे चित्रण दाखवले गेलेले आहे.परिणामी अनेक पिढ्यांना स्फुर्ती, प्रारणेविणा द्विधा मनस्थितीत शिक्षण पूर्ण करुन देखील प्रगती साधता आली नाही. यामुळे आपण गांभीर्याने यापुढे इतिहासातुन ऊर्जा प्रेरणा पराक्रम निर्माण करणारी ,विद्यार्थी घडवणारी पुस्तके विद्यार्थ्यांच्या हातामध्ये जातील यासाठी प्रयत्न करावेत. तसेच फडके प्रकाशनाला शैक्षणिक पुस्तके छापण्यासाठी व विक्री करण्यासाठी कायमस्वरूपी बंदी घालावी. या प्रकाशनाने शिवाजी विद्यापीठाच्या नावाचा दुरुपयोग बेकायदेशीररित्या वापर करून शिवकालीन इतिहास छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराराणी यांच्यासह सर्वच मराठ्यांच्या इतिहासाची मोडतोड केलेली आहे. याबद्दल राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करावे
प्रकाशनाच्या विद्यापीठाशी संलग्न शिवकालीन इतिहासाच्या पुस्तकातील विकृती

Read Time:2 Minute, 58 Second