Share Now
Read Time:1 Minute, 13 Second
छत्रपती शाहू महाराज यांचे चिरंजीव राजाराम महाराज यांची कन्या प्रिन्सेस पद्माराजे यांचे चिरंजीव आणि धुळ्याचे माजी आम. राजवर्धन कदमबांडे यांनी आज टाऊन हाॉल येथील नर्सरी बागेतील शाहूच्या समाधीस्थळाला भेट देवून अभिवादन केलं. छत्रपती शाहू महाराज यांनी उपेक्षितांना उन्नतीसाठी असलेल्या आरक्षण धोरणाचे त्यांनी पूर्वीच समर्थन केले आहे. कदमबांडे एका कार्यक्रमासाठी आज कोल्हापूरात आले होते. यावेळी काॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते पिटर चाौधरी, राष्ट्रवादीचे नितीन पाटील, भवानीसिंग घोरपडे, रविंद्र मोरे, विनोद डुणुंग, फत्तेसिंह राजमाने, तेजस जाधव, उदय धारवाडे, ॲड. यशवंत खानविलकर, अनिल कदम, बाबा मिठारी सिद्धाजी माने,संदीप जाधव यावेळी उपस्थतीत होते.
Share Now