जनसुराज्य महिला आघाडीच्या वतीने पन्हाळा तहसीलदार याना बेमुदत उपोषणाचा इशारा

मुलकी पड गायरान गावठाण तसेच रिक्रुट व समस्त हरिजन वन विभाग जमिनीचे स्वतंत्र सातबारा व खातेफोड करून मिळावी म्हणून दिनांक 14 रोजी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी मोर्चातील आंदोलकांना समोर येऊन माननीय उपविभागीय दंडाधिकारी पन्हाळा व तहसीलदार शाहुवाडी यांनी दीड महिन्यांमध्ये सातबारा पत्र कि नावे नोंद करून स्वतंत्र खाते फोड करून देण्याचे कबूल केले होते तसेच त्या अनुषंगाने कामकाज करण्यासाठी आंदोलकांना सोबत घेऊन कमिटी नेमण्यात आली होती तसेच कमिटी नेमल्यानंतर वरील कामांसाठी आठवड्यातील तीन दिवस वेळ देण्याचे मान्य तहसीलदार यांनी कबूल केले होते मात्र त्यानंतर वेगवेगळ्या कारणाने सातबारा पतरकी नावे नमूद करणे व खातेफोड करणे या कामात जाणूनबुजून दिरंगाई केली जात आहे .
स्वतंत्र सातबारा नसल्यामुळे गायरान मुलकी पड मध्ये असणारी

घरे नावावर होत नाही तसेच बँक प्रकरण महसूल विभागातील काही कामे पंचायत व सर्व शासकीय कामांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत रेशनकार्ड विभक्त होऊन जातीचा दाखला मिळण्यासाठी शासनदरबारी हेलपाटे मारावे लागत आहे या सगळया बाबीना जबाबदार कोण या प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस कारवाई होत नसल्याने वरील नियोजित तारखेस मान्य तहसीलदार कार्यालय शाहुवाडी यांचे समोर महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी सो कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर व पालकमंत्री यांच्या निवासस्थानावर लाखोंच्या संख्येत महिला आघाडीच्या तसेच जनसुराज्य पक्ष व जिल्ह्यातील सर्व बारा तालुक्यातील इतर पक्ष संघटना व जिल्ह्यातील सर्व महिलांच्या वतीने बेमुदत उपोषण करणार आहे . या प्रसंगी भूमिहीन अल्प भूधारक यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे तसेच या आंदोलनामध्ये कोणती अनुसूचित प्रकार घडल्यास त्या शासन जबाबदार राहील .
असं पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले यावेळी पूजा कदम महिला संघटक कमिटी अध्यक्ष ; दत्ता कांबळे ; लता कांबळे ; सुवर्णा पाटील ;मनोहर कांबळे ; शांताबाई गुरव; दादू कांबळे; बाजीराव कांबळे ;सुनील कांबळे; सुरेखा कांबळे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *