मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंती निमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी एस. टी. स्टँड समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले, जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महेश चोथे, समाजकल्याण विभागाचे सचिन साळे आदि उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्वांनी भारतीय संविधानाचे वाचन केले व समता रॅलीस सुरूवात करण्यात आली. ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महात्मा गांधी पुतळा (जुना स्टेशन रोड) सिटी पोस्ट पर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीत शासकीय अधिकारी, कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे प्रा. डॉ. सुधीर बनसोडे यांचे व्याख्यान घेण्यात आले आहे. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सांगली यांच्या मार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध विभागांचे शासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
