मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (शरद माळी/प्रतिनिधी) – कदमवाडी-भोसलेवाडी परिसरामध्ये गगनगिरी को-ऑप.हौसिंग सोसायटीमध्ये प्लॉट नंबर ५-६ च्या बाजूस असलेल्या खुल्या जागेत दिपकसिंह पांडुरंग पाटील यांच्या अथक परिश्रमातून गेली ९ वर्षे मंदिरासाठी कोर्ट कचेरी आणि ९ वर्षांपूर्वी राम नवमीच्या दिवशी जीवघेणा हल्ला होऊनही सातत्याने झुंज देऊन शनिवारी (दिनांक १३ एप्रिल रोजी) राम नवमीच्या उत्सव मोठ्या प्रमाणात ५०० ते ६०० हून अधिकाना महाप्रसाद वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या महाप्रसाद आणि उत्सवासाठी दिपकसिंह पांडुरंग पाटील यांना त्यांच्या पत्नी अस्मिता दिपकसिंह पाटील, वडील श्री.पांडुरंग तुकाराम पाटील, मुलगा अमेयसिंह दिपकसिंह पाटील, मुलगी अदिती दिपकसिंह पाटील, क्रांती बॉईज आणि क्रांती तरुण मंडळ तसेच इतर सहकारी मित्र मंडळ यांची मोठी मदत लाभली.
वादळी वारा त्यात भागातील वीज पुरवठा खंडित होऊनसुद्धा फक्त मोबाईल फ्लॅश लाईटच्या आधारे भागातील नागरिकांनी महाप्रसाद कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. वादळी वाऱ्याने मंडपास आणि कार्यक्रमास कोणताही धक्का लागला नाही, याचे कारण साईबाबांचे मंदिर आणि गगनगिरी महाराजांची प्रतिमेत जिवंतपणा असलेली मूर्ती याची जोरदार चर्चा कार्यक्रम ठिकाणी भाविकांमध्ये सुरू होती.
गगनगिरी महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापना होणार असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे भावनिक आवाहन दक्ष पोलीस टाइम्सचे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी सुशांत मनोहर पोवार आणि राम मराठाच्या अध्यक्षा ऐश्वर्या सुशांत पोवार यांनी केले. या कार्यक्रमास भागातील महिला व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.