मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – शिवाजी पेठेतील ब्रहमेशवर बाग येथे राहणाऱ्या श्रीमती प्रभावती शंकर जोशी वय (55) या महिलेच्या डोक्यात नारळाची फांदी पडल्याने दुर्देवी मृत्यू झाला. श्रीमती प्रभावती शंकर जोशी असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ब्रह्मेशवर बाग परिसरात शनिवारी राम नवमी निमित्त महाप्रसादाचे आयोजन केले होते. या दरम्यान हि घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी श्रीमती जोशी गेल्या होत्या. प्रसाद घेऊन घरी परतत असताना अचानक त्यांच्या डोक्यावर झाडाची फांदी पडून त्या जखमी झाल्या अन् त्या खाली कोसळल्या. त्या परिसरातील नागरिकांनी त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांना तेथील डॉक्टरांनी सीपीआरमध्ये नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले असता उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉकटरानी सांगितले.
श्रीमती जोशी यांच्या मागे मुलगा, सून,.दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. या घटनेची नोंद सीपीआर पोलिसात झाली आहे.