मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जावेद देवडी/प्रतिनिधी) – युवा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य आणि साप्ताहिक बहुजन रयत यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.
यावेळी ‘बहुजन रयत’चे संपादक कमलाकर सारंग यांनी बाबासाहेबांचे आणि चळवळीचे महत्त्व पटवून दिले तसेच युवा पत्रकार संघ राज्य कार्याध्यक्ष राजरतन हूलस्वार यांनी बोलताना, बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले स्वातंत्र्य, आपले हक्क, आपला अधिकार तरुण वर्गाने जोपासले पाहिजे .युवा वर्गाने व्यसनाच्या आहारी न जाता आपल्या मूलभूत हक्काकडे लक्ष दिले पाहिजे, असे सांगितले.
तसेच संस्थापक-अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ याबाबत माहिती देऊन संघटनेचे महत्व, संघटनेचे बळ पटवून दिले. यावेळी ‘दर्शन पोलीस टाइम्स’चे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार, राज्य खजानीस बाबुराव वळवडे, मीडिया कंट्रोल न्यूज चैनलचे उपसंपादक जावेद देवडी, कोल्हापूर विशेष प्रतिनिधी मुबारक आत्तार शेवटी संघाचे सचिव शरद माळी यांनी आभार मानले.