महाराष्ट्र राज्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदार यांचे प्रतिनिधित्व करणारी अखिल महाराष्ट्रात स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे
यांच्या सूचनेनुसार दिनांक 1 मे 2021 पासून आम्ही कोल्हापूर शहरातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदार संपावर जाणार आहोत कारण राज्यातील 55000 स्वस्त धान्य दुकानदार covid-19 कोरोना महामारी च्या काळात शासनाकडून कोणत्याही प्रकारची विमा कवच न देता धोरणामुळे मृत्युमुखी पडलेल्या परवानाधारकांना कोणतीही आर्थिक मदत न मिळता ही राज्यात कोरोना महामारी च्या काळात भूकबळी होऊ नये म्हणून अविरतपणे आपल्या जिवाची पर्वा न करता धान्य वाटप केलेले आहे
याची आपणास पूर्व जाणीव आहे तरीसुद्धा वारंवार शासनाकडे नम्र निवेदन देऊनही शासनाकडून यासंदर्भात कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे नाईलाजास्तव संघटनेला 1 मे 2021 पासून राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांचे धान्य वितरण व धान्य वाटप बंद करण्याचा निर्णय घेण्यात येत असून राज्यातील सर्व परवानाधारक मे 2021 साठी एप्रिल महिन्यात राज्य सरकारकडून सकारात्मक चर्चा झाल्याशिवाय वितरण करू नये व कोणत्याही परिस्थितीत धान्याचे वितरण होणार नाही
या राज्य संघटनेच्या निर्णयाशी कोल्हापूर शहर रेशन धान्य दुकानदार संघटना सहमत असून आमच्या खालील मागण्या आहेत.
१) कोरोना मुळे एखादा रास्त भाव धान्य दुकानदार मयत झाल्यास त्याला तात्काळ आर्थिक मदत व 50 लाख रुपये विमा कवच मिळावे.
२) राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वाटप करताना प्रतिक्विंटल एक ते दीड किलो घट येते ती घट ग्राह्य धरण्यात यावी व शासकीय धान्य गोडाऊन मधून धान्य दुकानदारांना 50 किलो 800 ग्रॅम वजनाची पोती देण्यात यावी.
३) राज्यातील सध्या असलेले ही पाॅस मशीन बदलून 4जी कनेक्शनची मशीन देण्यात यावी.
४) जिल्ह्यातील हमाली बंद करण्यात यावी.
५) कोरोना महामार्गामुळे समूह संसर्ग होऊ नये म्हणून शिधापत्रिकाधारकांचा थम न घेता दुकानदारांचा थम घेऊन धान्य वाटप करण्यास परवानगी देण्यात यावी.
उपरोक्त मागण्या अडचणी समस्या यावर आपल्याकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास किंवा या संदर्भात आपणाकडून कोणतीही चर्चा अथवा योग्य तो निर्णय न झाल्यास राज्यातील सर्व धान्य दुकानदार 1 मे 2021 पासून सर्व धान्य वितरण थांबवण्यात येईल.
यावेळी रविंद्र मोरे जिल्हा अध्यक्ष, राजेश मंडलिक,अशोक सोलापुरे, अरुण शिंदे, गजानन हवालदार, दीपक शिराळे आदी उपस्थित होते.