ठरावधारक आणि सभासद सत्तारुढ गटासोबत, विजय निश्चित चेतन नरके, सदानंद हत्तरकी, शौमिका महाडिकांना उमेदवारी: महाडिक

कोल्हापूर: स्नेहा शिंगे

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी सत्तारुढ गटाने उमेदवारांची यादी घोषित केली. विद्यमान चेअरमन रवींद्र आपटे यांच्यासह तब्बल १२ संचालकांना पुन्हा उमेदवारीची संधी दिली आहे. गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके यांचे पुत्र चेतन नरके, गडहिंग्लजमधून सदानंद हत्तरकी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शौमिका महाडिक हे नवीन चेहरे दिले आहेत.
सत्तारुढ आघाडीचे नेते आमदार पी.एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी अयोध्या लॉन येथ आज दुपारी सत्तारुढ गटाच्या उमेदवारांची नावे जाहीर केली.

Advertisements

सत्तारुढ गटाचे पॅनेल हे सर्वसमावेशक आहे. गोकुळमधील काही संचालक सत्तारुढ गटामधून बाजूला गेले असले तरी त्याचा काही परिणाम होणार नाही. ठरावधारक आणि सभासद हे सत्तारुढ गटासोबत आहेत. यामुळे निवडणुकीत सत्तारुढ गटाचा विजय निश्चित असल्याचा दावाही नेत्यांनी केला.

गोकुळमध्ये गेली अनेक वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक हे नेतृत्व करत आहेत. मात्र ते किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आजपर्यंत निवडणूक लढविली नव्हती. यंदा गोकुळच्या निवडणुकीसाठी त्यांच्या स्नुषा शौमिका महाडिक यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली।

या पत्रकार परिषदेला माजी मंत्री भरमू पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, संजय घाटगे उपस्थित होते.

सत्तारुढ पॅनेलमधील सर्वसाधारण गटातील उमेदवार
चेअरमन रवींद्र आपटे, रणजितसिंह पाटील, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, बाळासाहेब खाडे, उदय निवासराव पाटील, सत्यजित सुरेश पाटील, अंबरिश घाटगे, चेतन नरके, सदानंद हत्तरकी, धनाजीराव देसाई, रविश पाटील-कौलवरक, प्रताप शंकरराव पाटील , प्रकाश चव्हाण, राजाराम भाटले,रणजित बाजीराव पाटील

इतर मागासवर्गीय गट
विद्यमान संचालक पी. डी. धुंदरे.
भटक्या विमुक्त जाती जमाती
विद्यमान संचालक विश्वास जाधव
अनुसूचित जाती जमाती गट
विलास कांबळे.
महिला गट
विद्यमान संचालिका अनुराधा पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *