गोकुळ सत्तारूढ गटाच्या उमेदवार घोषणेवेळी सोशल डिस्टनसिंग नियमांची पायमल्ली : नेत्यांच्या तोंडावर मास्क ; पण कार्यकर्त्यांची तोबा गर्दी…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क

गोकुळ दूध संघाच्या तीन मे रोजी होणाऱ्या निवडणुकी साठी माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी एन पाटील आणि ज्येष्ठ संचालक माजी अध्यक्ष अरुण नरके यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडीने आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा मंगळवारी केली. ही यादी पत्रकार बैठक घेऊन ताराराणी चौक येथील हॉटेल अयोध्या कॉन्फरन्स हॉल येथे जाहीर करण्यात आली .कोविड च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंग नियमांचे सत्तारूढ गटाच्या नेत्यांनी काटेकोर पालन देखील केले .पण हे नियमांचे पालन स्वतःच्या सुरक्षेसाठीच होते की काय अशी शंका येण्यासारखे चित्र जाणवत होते .

Advertisements

अतिउत्साही कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या उत्साहाला आवर घालण्यात सत्तारूढ गटाच्या नेत्यांना यश आले नाही .शेकडो उत्साही कार्यकर्त्यांची तोबा गर्दी झाल्याने सोशल डिस्टनसिंग नियमांचा फज्जा उडाला .अनेक कार्यकर्ते विनामास्क या ठिकाणी वावरत असल्याचे चित्र पाहायला मिळाले .नेते मास्क सह आणि उत्साही कार्यकर्ते ‘ आम्हाला काय हुतय ? ‘ अशा आविर्भावात या ठिकाणी पाहायला मिळत होते

पत्रकार परिषद संपताच व्यासपीठावर एका ज्येष्ठ पत्रकाराला मिस्किलीने चला आघाडीचे नेते म्हणताच, प्रत्युत्तरात ज्येष्ठ पत्रकार म्हणाले एक किलो कोरोना जा घरी घेऊन

दोन वेळच्या अन्नासाठी भाजीपाला विकणारे फेरीवाले आणि टपरी धारकांवर दंडात्मक कारवाई करणारे महापालिका कर्मचारी ,अधिकारी आणि पोलीस यंत्रणेला ही गर्दी कदाचित दिसली नसेल. असा सवाल उपस्थित होत होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *