Share Now
Read Time:1 Minute, 23 Second
मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जावेद देवडी/प्रतिनिधी) – विरोधकांकडून विकासाच्या मुद्द्यावर बोलायला एकही गोष्ट नसल्याने ते बिनबुडाचे आरोप करत सुटले आहेत. पण, करवीरची जनता सुज्ञ आहे, ती अशा आरोपांना भुलणार नाही. खासदार धनंजय महाडिक मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील, असा विश्वास माजी आमदार पी एन पाटील यांनी व्यक्त केला.
ते पन्हाळा तालुक्यातील यवलुज येथील खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
या मेळाव्यात बाजीराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील, पंचायत समिती सभापती राजेंद्र सूर्यवंशी, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, विश्वासराव पाटील, संभाजी पाटील, पांडुरंग काशीद यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.
Share Now