Share Now
Read Time:1 Minute, 16 Second
मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (शरद माळी/प्रतिनिधी) – शिरोळ तालुक्यातील संभापूर गावामध्ये गुटखा करखान्यावर जयसिंगपूर पोलिसांनी छापा मारला. यामध्ये सुमारे 10 ते 12 लाख रुपयांचा बनावट गुटखा जप्त केला आहे. यावेळी पोलिसांनी कारखान्याची झडती घेतली असता सुमारे 74 लाख रुपये रोकडसह मुद्देमाल देखील जप्त केला. या कारवाईमध्ये दोघाना अटक केली आहे.

बरकत अन्वर गवंडी (रा. कचरे सोसाइटी, संभाजीपूर, ता.शिरोळ) याच्या घरात आणि घरासमोरील बेकरीमध्ये गुटख्याचे सुमारे 10 ते 12 गठ्ठे आणि सुमारे 74 लाख 65 हजार 200 रुपये रोकड मिळाली आहे.

सदर कारवाई फ़्लाइंग स्कॉडचे तहसीलदार गुरव साहेब, बीडीओ जाधव तसेच जैसिंगपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

Share Now