Getting your Trinity Audio player ready...
|
विशेष वृत्त: जावेद देवडी
सायबर क्राइम करणार्या ठगांना शाहुपूरी पोलीसांनी दिला दणका
देशात व संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाचे सर्व पदाधिकारी कर्मचारी २४ तास प्रयत्न करत आहेत त्यात महत्वाचे कर्तव्य बजावणारे कोरोना योद्धे म्हणून पोलिस अधिकारी व कर्मचारी लढा देत आहेत
देशातील सर्व व्यवहार ठप्प झाले याचाच गैरफायदा घेत
आँनलाईन पद्धतीने सायबर क्राईम मध्ये वाढ होताना दिसत आहे.
अशाच पद्धतीने लुबाडणूक करणा-या ठगांना मात्र शाहूपुरी पोलिसांनी दिला दणका.
HDFC बॅंक, कोल्हापूर येथे काम करणार्या लवली कुमारी ( मुळच्या बिहार ) यांना फेसबुकद्वारे एका अनोळखी इसमांने मॅसेज केला. सदर इसमाने स्वतःला परदेशी नागरीक आहे असे भासवित अर्जदार कुमारी यांना सांगितले की, तुमच्यासाठी गिफ्ट पाठविले आहे पण ते एअरपोर्ट येथे काही कायदेशीर कारणाने अडकले आहे आणि त्यामुळे एअरपोर्टवर ३५,५००/- रुपये इतका दंड झाला असुन तो भरावा लागेल नाहीतर आपल्याला अडचणी येतील अशी भिती घालून आणि भुलथाप्पा लावून फिर्यांदी यांचे कडून ३५,५००/- इतकी रक्कम उकळली होती.
पण त्याचे कडून अधिक पैशांची मागणी होताच फिर्यांदी यांचे लक्षात आल्याने अर्जदार यांनी शाहुपूरी पोलीसांना तक्रारी अर्ज दाखल केला होता. सायबर गुन्ह्याच्या वाढते प्रमाणाचे गांभीर्य ओळखुन शाहुपूरी पोलीस निरीक्षक श्री. कटकधोंड यांनी पोलीस ठाणेकडील सायबरचे काम पहाणारे पो.कॉ. दिग्विजय चौगले यांना तात्काळ तपासाच्या सुचना केल्या होत्या. पण सायबर ठग हे असे गुन्हे करताना फेक नाव / डाक्युमेंट असलेले सिम कार्ड तसेच फेक डाक्युमेंटचे बॅंक खात्याचा वापर करत असल्याने त्याचा तपास हा आव्हानात्मक असतो. पण प्राप्त माहितीच्या आधारे कसोशिने तपास करत झालेले ट्रान्झक्शनचा आधार घेत दिग्विजय चौगले यांनी अर्जदार यांचे फसवणूक करुन काढून घेतलेली रक्कम परत मिळवून दिली.
कर्तव्यदक्ष पो.कॉ. दिग्विजय चौगले यांची पोलिस निरीक्षक यांच्या कडून कौतुक होत आहे.
शाहूपुरी पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या सूचनेनुसार,सर्व नागरिकांना शाहुपूरी पोलीसांतर्फे आव्हान करण्यात येते की,
1. सोशल मेडीयावर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करु नये तसेच अनोळखी इसमाने पाठविलेल्या कोणत्याही लिंक ओपन करु नका.
2. महत्वाची बोलणी, व्यवहार किंवा करार हे समक्ष भेटूनच करावेत सोशल मेडींयांवरील फसव्या जहिरांती किंवा अमिषांपासून सावधातना बाळगावी.
3.फोन द्वारे कोणालाही ए.टि.एम. कार्ड नंबर, सी.सी.व्ही नंबर व बॅंकेतून आलेला ओ.टी.पी. नंबर कोणाशीही शेअर करू नका.
4.आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ जवळचे पोलीस व बॅंक यांचेशी संपर्क करणे.
4.अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरुन आपल्या वापरत्या मोबाईल मध्ये कोणतेही स्क्रीन रिडींगचा अक्सेस देणारे एॅप डाऊनलोड करु नका.
5. ऑनलाईन सुविधांचा उपयोग घेत असताना निष्काळजी राहु नका.