गेली ९ वर्षां पासून वोटसप ग्रुप चालू आहे, अनेक अशी उदाहरणे देता येतील उदा, भुकंप , महापूर,आता करोना तसेच कोवीड सेंटर, सीपीआर, रस्त्यावर गरजू लोकांना, जेवण, नाष्टा रोज देतात, पोलिस कर्मचारी, आशा वर्कर्स, मनपा कर्मचारी, यांना सरबत, पाणी, कौटुंबिक परिस्थिती नोकरी धंदा बुडाला आहे तेना ऐक महीनाभर पुरेल इतका शिधा ,पर राज्य तील लोकडाउन मुळे अडकलेले ड्रायवर यांना जेवण
कोविड बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाने जवळपास गेले एक महिन्यापासून लॉकडाउन केलेला आहे. या लॉकडाउनमुळे सर्वसामान्य लोकांचा रोजगार गेल्यामुळे उपाशी राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या परिस्थीतीची जाणिव ठेवुन कोल्हापुरातील धंद्यात तेजी मंदी ग्रुपतर्फे गरजूंना एक महिना पुरेल इतकं रेशन कीट वाटप करण्यात येत आहे. लॉकडाउन सुरु झाल्यापासून कीटचे वाटप झाले असुन इथूनपुढे लॉकडाउन संपेपर्यंत हा उपक्रम सुरु राहणार आहे. या उपक्रमा बरोबरच या ग्रुपने पोलिसांसाठी पाणी व फळे वाटप हा उपक्रमही सुरु ठेवलेला आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यामधे सचीन मुसळे, हितेश ओसवाल,कुमार ओसवाल, महेंद्र ओसवाल mk , दिनेश ओसवाल,प्रितम ओसवाल,महेंद्र ओसवाल, नरेंद्र ओसवाल नारू,अजीत भोसले,निलेश गांधी, सुखराज ओसवाल याचा सहभाग आहे .