कोल्हापूर/प्रतिनिधी : छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात मुस्लिम मावळ्यांना प्राधान्याने स्थान देण्यात आले होते.स्वराज्य निर्मितीत मुस्लिम मावळ्यांचे योगदान वादातीत होते.नेमकी हीच भूमिका घेत आज कोल्हापुरात झालेल्या शिवस्वराज्य दिन सोहळ्यात कोल्हापूरच्या पुरोगामी ,शिवप्रेमी मुस्लिम मावळ्यांना मानाचं स्थान देत हा सोहळा साजरा करण्यात आला.मनसेचे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्या पुढाकारातून हा सोहळा झाला .बिंदू चौक परिसरातील विठ्ठल मंदिरात शिवप्रतिमापूजन आणि पुष्पवृष्टी करून स्वराज्याचे निर्माते युगपुरुष छत्रपती शिवरायांना वंदन करण्यात आले. हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष संजय साडविलकर यांनी जाती धर्माच्या भिंती तोडून टाकुन महापूर आणि कोरोना काळात सर्वांच्याच मदतीला धावून येणारी मुस्लिम बांधवांची बैतुलमाल कमिटी आणि या कमिटीचे जाफरबाबा सैय्यद यांचे कार्य छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असणारेच आहे, असे गौरवोद्गगार काढले .यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी, अखतर इनामदार,फारुख पटवेगार, मौलाना नाजीम पठाण, पप्पू शेख, अजित पवार, अभिजित ओतारी, गणेश कांदळकर, मकरंद दळवी, कपिल काकडे, मोहसीन मेस्त्री, समीर शेख, आरिफ नदाफ, संजय जाधव, विनायक काकडे, अनिकेत बिराडे, साहिल शेख आदी शिवप्रेमी उपस्थित होते .यावेळी राजू जाधव आणि कादर मलबारी यांच्या हस्ते हिंदू मुस्लिम बांधवाना मिठाई भरवून शिवस्वराज्य दिन सोहळा झाला .
———————- जाहीरात ————————