जागतिक पर्यावरण दिनानिमित्त युवा पत्रकार संघ व स्वरा फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण

 

 

युवा पत्रकार संघ , स्वरा फौंडेशन व महापालिकेच्यावतीने जयंती पंपिंग स्टेशन येथे अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई, लक्ष्मीपुरी पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक अनिल गुजर, वाहतूक पोलीस निरीक्षक नेहा गिरी, युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे, यांच्या हस्ते

 

वड, पिंपळ, जारूळ, बदाम, कदंब, करंज, गुलमोहर, बकुळ ही झाडे लावून वृक्षरोपण करण्यात आले.

Advertisements

कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी पी आय अनिल गुजर,पी आय नेहा गिरी,याचे वृक्ष देऊन स्वागत केले, व स्वरा फाउंडेशन टीमचे कौतुक केले.

 

विशेष म्हणजे डेली रिड न्युज पोर्टल चे संपादक ओमकार वळवडे यांचा वाढदिवस होता त्यांनी वृक्षारोपण या उपक्रमात सहभाग नोंदवून आपल्या स्वतःच्या हस्ते वृक्ष लावून वाढदिवस साजरा केला.

यावेळी स्वरा फौंडेशन डायरेक्टर प्राजक्ता माजगावकर, प्रमोद माजगावकर, युवा पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष संदीप शिंदे (दै.महासत्ता), अजय शिंगे, (मिडिया कंट्रोल) शाखा अभियंता आर के पाटील, अध्यक्ष सविता पाडलकर, स्नेहा शिंगे, युवा पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष जावेद देवडी, उपाध्यक्ष अमृता वास्कर, पियुष हुलस्वार, प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव वळवडे, जीवन आधार रेस्क्यू चे विनायक लांडगे, फैजाण देसाई, सतीश वडणगेकर, उदय पाटील, रमेश नेर्लेकर, शिवाजी मगदूम व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *