गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील मृत्युदर कमी होण्यासाठी प्रयत्न करा : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 54 Second

कोल्हापूर/जि मा का दि. 12: गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यात तपासण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. यामुळे रुग्णदर अधिक आढळून येत असला तरी मृत्युदर कमी होण्यासाठी आरोग्य, महसूल, जिल्हा परिषदेसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या.

गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणाबाबत दुरदृश्यप्रणालीद्वारे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली गडहिंग्लज पंचायत समिती सभागृहात बैठक घेण्यात आली, यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला आमदार राजेश पाटील, उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, उपविभागीय अधिकारी संपत खिलारी(ऑनलाइन), उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, तहसीलदार दिनेश पारगे, गट विकास अधिकारी शरद मगर, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप आंबोळेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अथणी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने राज्य शासनाच्या वतीने आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील रुग्णांसाठी बेडची संख्या वाढवण्यात येत आहे. प्रशासनाने देखील सज्ज राहून आरोग्य सुविधा वाढवाव्यात. गृह अलगिकरण प्रभावीपणे करा.प्रतिबंधित क्षेत्रात निर्बंधांचे पालन होत असल्याची पाहणी करा,असे सांगून ते म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले असले तरीदेखील नागरिकांनी मास्कचा वापर करणे व गर्दीत जाणे टाळायला हवे. 60 वर्षावरील नागरिकांनी लस घेऊन सुरक्षित व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आमदार राजेश पाटील यांनी या भागातील कोरोना परिस्थिती बाबत माहिती देऊन आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय सुविधा व यंत्रसामग्रीबाबत सांगितले.

उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर म्हणाल्या, सध्या गडहिंग्लज तालुक्यात 571 बाधित रुग्ण असून मृत्युदर 3.43 टक्के आहे. तर चंदगड तालुक्यात 348 बाधित रुग्ण असून मृत्युदर 3.13 टक्के आहे. गृह अलगिकरणावर भर, प्रतिबंधित क्षेत्रात कडक नियम, गर्दीवर नियंत्रण आदी उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

उपविभागीय अधिकारी संपत खिलारी म्हणाले, आजरा तालुक्यात बाधित रुग्ण 337 असून मृत्युदर 3.13 टक्के आहे. तपासण्यांची संख्या वाढविण्यात आली असून रुग्णदर व मृत्युदर कमी होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *