Share Now
प्रतिनिधी:इम्रान मोमीन
कोल्हापूर जिल्हा परिषदेत मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना
देण्यात येणारा धन्वंतरी पुरस्कार शिरोली (ता.करवीर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा विलास मोरे यांना जाहिर झाला आहे.
डॉ. मोरे या गेली २९ वर्षे वैद्यकीय क्षेत्रात काम करत असून सेवा काळात अनेक अडचणींना तोड देऊन आरोग्य सेवा सर्व
सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी तसेच महापूराच्या काळात पूरग्रस्त गावात साथीचे रोग पसरू नये यासाठी त्यानी प्रयत्न केले होते.
या कार्याची दखल कोल्हापूर जिल्हा परिषदेने घेऊन सन २०१९/२०चा दिला जाणारा धन्वंतरी पुरस्कार जाहिर केला असून पुरस्काराने छत्रपती शाहू महाराज यांच्या जंयती दिवशी २६ जुन ला देण्यात येणार आहे.
डॉ.मोरे यांच्या वर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Share Now