Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर : विशेष वृत्त:-जावेद देवडी
शाहुपूरी पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरी गुन्ह्याचे प्रमाण वाढले होते . पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण , शहर विभाग ,यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता मार्गदर्शन करुन गुन्हे उघडकीस आणा अशा सक्त सुचना दिल्या होत्या . त्याअनुषंगाने शाहुपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ ऋशिकेश पवार , पोना धर्मेंद्र बगाडे , पोकॉ सागर माने , शुभम संकपाळ यांना मोटरसायकल चोरीस जाणाऱ्या घटनास्थळांचा अभ्यास करुन त्याप्रमाणे सापळा लावून , गोपनिय बातमीदारांना सतर्क करुन आरोपीचीे शोध मोहीम यंत्रणा गतिमान केली होती. त्या अनुषंगाने पथकातील कर्मचारी गेले काही दिवस रात्र कार्यरत होते .पण त्यांना यश मिळत नव्हते .
वेळोवेळी सापळा लावून देखील आरोपीची खात्रीशीर माहिती मिळत नव्हती . त्यामुळे सदर चोरटयांचा शोध घेवून त्यांना जेरबंद करण्याचे आवाहन पोलीसांसमोर होते . ‘११ जुलै रोजी या गुन्हे शोध पथकातील पोलिस कॉन्स्टेबल सागर माने व शुभम संकपाळ यांना त्यांच्या विश्वासु गोपणीय खबऱ्याने याबाबत खात्रीशीर माहिती दिली. त्यानुसार मोटार सायकल चोरी करणारा रेकॉर्डवरील आरोपी अजय पटकारे हा त्यांच्या साथीदारांसह मोटरसायकल विक्री करण्यासाठी मार्केट यार्ड परिसरात येणार होता. त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे पोलिस हवालदार धर्मेंद्र बगाड़े, कॉन्स्टेबल सागर माने, शुभम संकपाळ, विजय इंगळे यांनी तिथे सापळा लावला. मार्केट यार्ड रेल्वे गोडावून परिसरात अजय पटकारे हा विना नंबरप्लेटच्या मोटरसायकल वरुन त्यांच्या दोन्ही साथीदारासोबत तिथे आला. या तिघांनाही पोलिस पथकाने ताब्यात घेतले.पोलिस ठाण्यात आणून त्यांची कसून चौकशी केली असता अजय पटकारे (वय ३८, राहणार शिंदे मेडिकलमागे, विचारे माळ, कोल्हापूर), दादासो रामचंद्र पाटील (वय २५, राहणार कुर, तालुका भुदरगड ) आणि सौरभ राजू शिंदे( वय २५, राहणार खानापूर , तालुका भुदरगड ) या तिघांना ताब्यात घेताना मिळून आलेल्या मोटरसायकल सह एकूण चौदा मोटरसायकली चोरल्याची कबूली दिली.शाहूपुरीतील जसवंत स्वीट्स, मध्यवर्ती बस स्थानक ते परीख पूल, ताराबाई पार्क, शिवाजी पार्क, धैर्यप्रसाद हॉल चौक, आयटीआय परिसरातुन मोटरसायकली चोरल्याचे त्यांनी कबूल केले. ही सर्व वाहने त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली.त्यांच्याकडून एकूण तीन लाख पाच हजार रुपये किमतीच्या चौदा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या.यातील प्रमुख आरोपी अजय पटकारे हा
करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घड़लेल्या चोरी प्रकरणात जानेवारी महिन्यापासुन फ़रारी असल्याची बाब उघड़कीस आली .अजय पटकारे आणि त्याच्या साथीदाराकड़ून अशा पद्धतीचे आणखी गुन्हे उघड़कीस येण्याची शक्यता आहे . सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मा.अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे,मा.उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण, मा. पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, शाहूपुरी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सागर पाटील ,सफौ प्रकाश भंडारे, पोहेकॉ ऋषिकेश पवार, पोना धर्मेंद्र बगाडे, युवराज पाटील, प्रशांत घोलप ,पोकॉ सागर माने ,शुभम संकपाळ, विजय इंगळे यांनी केली आहे