Getting your Trinity Audio player ready...
|
विशेष वृत्त: जावेद देवडी
२०१७ साली कोल्हापुरातील कावळा नाका माकडवाला वसाहतीमध्ये घडली होती दुर्घटना दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून जन्म देणाऱ्या आईचाच खून करून तिचे काळीज व इतर अवयव खाणाऱ्यांना कूरूर मुलाला न्यायालयाने गुरुवारी मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली.
सुनील रामा कुचकोरवी (वय ३५,रा .माकडवाला वसाहत,कोल्हापूर) असे शिक्षा झालेल्या निर्दयी मुलाचे नाव आहे.तर यल्लवा रामा कुचकोरवी असे मृत झालेल्या दुर्भागी मातेचे नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी,
कोल्हापुरातील माकडवाला वसाहतीमध्ये ६२ वर्षीय यल्लवा कुचकोरवी या त्यांचा ३५ वर्षीय मुलगा सुनील कुचकोरवी याच्यासह रहात होत्या.सुनील कुचकोरवी याला दारू पिण्यासह अन्य नशा करण्याची व्यसने होती.२८ ऑगस्ट २०१७ रोजी सुनील कुचकोरवी हा मद्यधुंद अवस्थेत त्याच्या घरामध्ये आला होता. त्यावेळी त्याने त्याची आई यल्लवा कुचकोरवी यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले.मात्र यल्लवा कुचकोरवी यांनी त्याला नकार दिला. त्या रागातून सुनील कुचकोरवी याने त्याची आई यल्लवा कुचकोरवी यांच्यावर सूरी व सत्तुर अशा धारदार हत्यारांनी हल्ला चढवून, यल्लवा कुचकोरवी यांचा खून केला होता. त्यानंतर त्याने आई यल्लवा कुचकोरवी यांचे शरीर पूर्णपणे फाडून, त्यांच्या शरीरातील हृदय, यकृत, आतडी, कोथळा व काळीज कापून काढून ते चुलीच्या कट्ट्यावर ठेवून, त्याला तेल, चटणी व मीठ लावून, हे सर्व अवयव तो खात होता. परिसरातील लोकांच्या ही दुर्घटना निदर्शनास आली. लोकांनी सुनील कुचकोरवी याला पकडून ठेवून, याबाबतची माहिती शाहूपुरी पोलिसांना तातडीने कळवली होती.
हा धक्कादायक प्रकार कळताच शाहूपुरी पोलिसांनी तात्काळ धाव घेत, आईचा खून करून तिचे काळीज खाणाऱ्या सुनील कुचकोरवी याला अटक केली होती. त्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी या प्रकरणाचा तपास जलदगतीने करून, न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश महेश जाधव यांच्या न्यायालयात पूर्ण झाली.
सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॕड . विवेक शुक्ल यांनी काम पाहिले. त्यांनी एकुण १२ साक्षीदार तपासले . या खून खटल्यामध्ये कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता . मात्र परिस्थितीजन्य पुरावे व जिल्हा सरकारी वकील अॅड . विवेक शुक्ल यांनी केलेला विस्तृत युक्तिवाद,
तसेच आई व मुलाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या दुर्मिळ गुन्ह्याबाबतची माहिती, अशा सर्व बाबींचा विचार करून, न्यायालयाने याप्रकरणी सुनील कुचकोरवी याला दोषी ठरवले व त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा गुरुवारी ठोठावली. याबरोबरच त्याला २५ हजार रुपये दंडाची शिक्षाही सुनावण्यात आली.
या गुन्ह्याची प्रत्यक्षदर्शी कोणीही साकक्षिदार नव्हता, संपुर्ण जिल्हा व राज्य हादरून सोडलेल्या अश्या गुन्ह्याची सखोल चौकशी व तपास करून शाहूपुरी पोलिस ठाण्याचे तत्कालीन व सध्या भुदरगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे व तपास पोलीस कर्मचारी यांनी कर्तव्यनिष्ठ तपासणी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानेच आरोपीला योग्य ते शिक्षा मिळाल्याने कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाचे सन्मानात वाढ झाल्याचे सांगत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी समाधान व्यक्त केले
पोलीस निरीक्षक संजय मोरे,
यांना १५,००० रुपये. बक्षीस देऊन कौतुक करून विषेस सत्कार केला.