कोल्हापूर/प्रतिनिधी, महावितरण महाराष्ट्र राज्य वितरण महामंडळ ताराबाई पार्क कोल्हापूर, येथे राष्ट्र विकास सेनेच्या वतीने मा. प्रशांत भाऊ सदामते – युवक प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य. यांचे नेतृत्वाखाली तसेच मा.अमोल साठे – कोल्हापूर जिल्हा युवक अध्यक्ष आणि मा. शंकर वडार- कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष यांच्या उपस्थितीत बोंबठोक व टाळे ठोक आंदोलन करण्यात आले .
सदर आंदोलना वेळी मा.प्रशांत भाऊ सदामते यांनी , वीज बील आकारणी सक्तीची न करता सामान्य आणि गोर गरीब जनतेला त्या बिला मध्ये सवलत द्यावी तसेच टप्प्या – टप्प्या ने वीज बील भरणेस लोकांना परवानगी द्यावी व त्या अनुषंगाने सामान्य नागरिकां मध्ये जन जागृती शासना कडून केली जावी अशी मागणी केली . या दरम्यान प्रशांतभाऊ सदामते यांनी जर महावितरण कंपनी कडून कोणाचे वीज कनेक्शन तोडले गेले तर राष्ट्र विकास सेनेचे पदाधिकारी कायदा हातात घेऊन स्वतः विजेच्या खांबावर चढून ज्यांचे कनेक्शन तोडले आहे त्यांचा वीज पुरवठा सुरू करून देतील या वेळी होणाऱ्या नुकसानीस व जीवित हाणीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री जबाबदार राहतील असा इशारा दिला .
या आंदोलनाचे वेळी राष्ट्र विकास सेनेच्या वतीने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार , विरोधी पक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री यांच्या नावे बोंब ठोकून त्यांचा जाहीर निषेध करत त्यांना संघटनेच्या वतीने कंदील , पणती आणि कुलूप भेट देण्यात आले. या वेळी राष्ट्र विकास सेनेच्या वतीने राकेश कांबळे , रोहन कांबळे , सूरज कांबळे, राकेश सावंत , रोहित धनवडे , अनिता कांबळे , असीम नुरानी व इतर पदाधिकारी ,कार्यकर्ते तसेच पोलिस फौज फाटा मोठ्या संख्येने उपस्थित होता.