युवा उद्योजक व युवा पत्रकार संघाचे प्रवीण पाटील यांनी वृक्षारोपणातून जपली सामाजिक बांधिलकी

विशेष वृत्त : जावेद देवडी

कोल्हापूर/युवा उद्योजक व युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे राज्य संघटक प्रवीण पांडुरंग पाटील यांनी सरनोबतवाडी परिसरात स्वनिधीतून सुमारे शंभर औषधी वनस्पतींची लागवड आणि वृक्षारोपण करण्याच्या उपक्रमाच्या माध्यमातून आपला वाढ दिवस साजरा करून सामाजिक बांधिलकी जपली .

समाजमन जपणाऱ्या त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

यावेळी बोलताना प्रवीण पाटील यांनी पर्यावरण रक्षणाची गरज लक्षात घेऊन वृक्षारोपण उपक्रम राबवल्याची माहिती दिली. प्रत्येकाने पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी एक व्यक्ती-एक झाड ही संकल्पना राबवावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी सचिन शिंदे,अमित रावळकर,रुपचंद रजपूत, मन्सूरअली जमादार, चंद्रकांत पाटील, संदीप कांबळे,प्रफुल्ल कांबळे,जमीर नायकवडी,महेश कांबळे,संग्राम पाटील,विजय पाटील,पांडुरंग पाटील,गोविंद गावडे,विश्वास पोवार,प्रदीप पाटील आदि उपस्थित होते.

———————जाहीरात————————

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *