घरफोडीची शाहूपुरी पोलीस ठान्याच्या गुन्हे शोध पथकांनी लावला छडा आरोपी गजाआड़ : एक लाख बत्तीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत.

विशेष वृत्त:-जावेद देवडी  कोल्हापूर शहरातील शाहूपुरी पहिल्या गल्लीत राहणाऱ्या सुधीर धोंडोपंत कीर्तणे या ७७ वर्षीय वृद्धाच्या घरी झालेल्या दीड लाख रुपयांच्या चोरीच्या घटनेची उकल करण्यात शाहूपुरी पोलीस ठान्याच्या गुन्हे शोध पथकाला यश मिळाले आहे .घरफोडी झाल्यानंतर केवळ नऊ दिवसात या चोरीतील संशयित आरोपी दिग्विजय अनिल जाधव या तेवीस वर्षीय तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

या घरफोडीच्या गुन्ह्यात चोरीला गेलेल्या दीड लाख रुपये रकमेतील एक लाख बत्तीस हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे .

सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे आणि खबऱ्यानी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दिग्विजय जाधवला ताब्यात घेतले.त्याची कसून तपासणी केली असता त्याने बनावट चावीच्या आधारे कपाट उघडून फिर्यादी सुधीर कीर्तणे यांच्या घरात चोरी केल्याची कबुली दिली आहे .

दिग्विजय जाधव पोलिसांच्या रेकॉर्डवर पहिल्यांदाच आला आहे .त्याच्याकडून बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी सांगितले.

या प्रकरणाच्या तपासासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कोरके, गुन्हे शोध पथकाचे पोलीस नाईक धर्मेंद्र बगाडे, पोलिस कॉन्स्टेबल सागर माने, शुभम संकपाळ, जगदीश बामणीकर यांनी परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *