युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या सांगली येथे महीला विभागाची बैठक पार पडली..

 

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य महिलांचा सन्मान करुन स्वातंत्र विभाग करून कार्य करणयास प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुचना दिल्या नंतर महीला पदाधिकारी सदस्यांनी आघाडी घेत सांगली जिल्हा विश्रामग्रह येथे महीला पत्रकार व नविन नवोदित पत्रकार होण्यासाठी इच्छुकांची बैठक घेऊन संघांमध्ये सामील होण्यास आव्हान केले.

Advertisements

राज्य महिला अध्यक्षा सौ अर्चना चव्हाण यांच्या सुचनेनुसार सांगली जिल्हा महिला अध्यक्षा सुवार्ता तिवडे यांच्या नेतृत्वाखाली, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा सौ मार्था भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली, ह्यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा मार्था भोसले यांनी उपस्थित महिलांना पत्रकार संघाची माहिती देऊन महत्व पटवून दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मिरज शहर अध्यक्षा व संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष सौ वंदना चंदनशिवे यांनी संघाचे कार्य कौतुकास्पद असून महीला व युवतींना पत्रकार होऊन अन्याय अत्याचार विरोध लढण्यास बळच मिळणार असून त्याच बरोबर नवोदित पत्रकार होण्यासाठी संधी मिळणार आहे. म्हणून जास्तीत जास्त महीला व युवतींनी सहभाग होऊन याचा लाभ घेतला पाहिजे.

सांगली जिल्हा महिला अध्यक्षा सुवार्ता तिवडे यांनी उपस्थितांचे अल्पोपहार देऊन आभार मानले.

या वेळी बैठकीला संध्या आवळे, रेचल मगदुम, सुधा कांबळे, आम्रपाली कदम, पुनम रजपुत, प्रियांका विचारे, अनिता आवळे,सुभांगी वायदंडे, राधिका लोंढे उपस्थितीत होत्या
तसेच या बैठकीला प्रदेश सचिव शरद गाडे, प्रदेश कार्याध्यक्ष संतोष कुरणे सदस्य प्रविण मिरजकर, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *