वडिलांचे पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.

विशेष वृत्त मार्था भोसले

नागाव ता. हातकणंगले येथे विद्याधर कांबळे यांनी वडिलांच्या तिस-या पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

Advertisements

त्यामध्ये शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतः रक्तदान करुन पोलिस ही माणुस आहे हे संदेश देत शिबीरामध्ये सहभाग नोंदविला. 

पुण्यस्मरणा निमित्त अनावश्यक खर्च टाळून रक्त दान शिबिराचे आयोजन केले होते, या शिबिरास तरुण वर्गाचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी कांबळे कुटूंबियांच्या वतीने रक्तदान केलेल्या व्यक्तींना भेटवस्तू देण्यात आली, या शिबिराचे उद्घाटन शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांच्या हस्ते झाले,

यावेळी बोलताना राजेश खांडवे म्हणाले की कोरोनामुळे राज्यात रक्त टंचाई असल्याने रक्त दान करुन एक वेगळा उपक्रम कांबळे कुटूंबियांनी राबविला त्याबद्दल त्यांचे कौतुक केले,

या कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी चे जिल्हा नेते सतीश माळगे,नंदकुमार कर्णिक, गौतम कांबळे,विवेक नागावकर, विजय बाचने,सुकुमार कांबळे, दयासागर कांबळे, अमित खांडेकर,सनी बाचने,प्रशांत देशमुख,रोशन कांबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *