हायवेवर प्रवासी व वाहनांना अडवून धारधार हत्याराने धाक दाखवून लुटमार करणार्या चार चोरट्यांना शाहूपुरी पोलिसांनी केले जेरबंद

विशेष वृत्त : जावेद देवडी

शाहूपुरी ची बेधडक कामगीरी

Advertisements

१५/१०/२०२१ रोजी रात्रीच्या सुमारास एम.आय.डी.सी, येथे काम करणा-या २१ वर्षीय युवक रात्री ००-३० वा.
तावडे हॉटेल येथून त्याचे राहते घरी बापट कॅप येथे जात होता. त्यावेळी अचानक दोन गाड्यावरुन येणाऱ्या अनोळखी
चार इसमानी फिर्यादी यास आडवले व त्याचे कडून मोबाईल व पैशांची मागणी करु लागले फिर्यादी युवकाने त्यास प्रतिकार
करताच त्यास मारहान करुन त्याचे खिश्यातील मोबाईल व रक्कम बळजबरीने काढून घेतली होती, वरील घडले प्रकाराबाबत
दिनांक १५/१०/२०२१ रोजी शाहुपूरी पोलीस ठाणेस गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल झाला होता.
तसेच वरील गुन्हा घडला त्याच
दिवशी तावडे हॉटेल ब्रिज जवळ ट्रक चालकाकडून अश्याच प्रकारे जबरी चोरी करून त्याचेकडील
एकूण १८,८००/- रोख रक्कम व मोबाईल हिसकावून घेतले होते याबाबत गांधीनगर पोलीस ठाणेस जबरी चोरीचा गुन्हा नोंद आहे.
त्यानुसार दोन्ही घटनांचा घटनाक्रम जुळत होता सदरचा घडलेला प्रकार हा कोल्हापूर शहराला लागून असलेल्या हायवेवरील
गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याने तसेच रात्रीच्या वेळी घडल्याने आरोपींचा शोध घेणे आव्हानात्मक होते. त्यामुळे सदर गुन्ह्याच्या
तपासाच्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे
उपविभागीय महिला पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांनी बारकाईने लक्ष ठेवून वारंवार मार्गदर्शन व सुचना केल्या
होत्या.
त्या अनुषंगाने शाहुपूरी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी गुन्हेशोध पथकाला वरीष्ठांनी दिलेल्या सुचनेनुसार गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले होते.
त्यानुसार प्राप्त फुटेज तसेच तांत्रिक माहिती च्या आधारे तपासात गती घेतली असता
आरोपी मणेर माळ येथील असल्याची खात्री झाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सदर ठिकाणी जावून गोपनीय बातमीदार
तयार करुन आरोपींची नावे निष्पन्न केली. गुन्ह्यामध्ये एकुण चार आरोपींचा सहभाग असल्याने एका आरोपीस ताब्यात घेत
असताना इतर आरोपींना त्याची माहिती मिळाल्यास ते पळ काढून जावू नयेत म्हणुन पथके तयार करुन मध्यरात्री प्रत्येक
आरोपींच्या हलचालींवर लक्ष ठेवत सापळा लावला व एकाचवेळी छापा टाकून

१) सुरज संजय पाटील
व.व २२,रा.भुषण कॉलनी मणेर माळ कोल्हापूर,
२) उमेदा गोगा तांबोळी, व.व १९
३)अक्षय सोमनाथ वाघमोडे,व.व.२२
४) सिद्धांत उर्फ गुलू संदिप रसाळ
व.व. २३ सर्व रा.साईनाथ कॉलनी मणेर माळ कोल्हापूर
आरोपींना शिताफिने व कौशल्याने ताब्यात घेतले.
प्रथम दर्शनी वरील दोन्ही गुन्ह्यांबाबत काही एक माहिती सांगत नव्हते परंतु त्याचेकडे सखोल तपास केला असता त्यांनी
दोन्ही गुन्ह्याची कबुली देवून दोन्ही गुन्ह्यातील गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यामध्ये रोख रक्कम १९, २००/- रुपये,व एकूण ६ मोबाईल, दोन मोटरसायकल, दोन धारधार हत्यारे असा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर आरोपीच्या कडे अधिक तपास करता त्यांनी त्याच रात्री पेट्रोल पंपावरील कार्मचारी यास बाटली मध्ये
पेट्रोल दिले नाही म्हणुन हत्यारे दाखवून त्यास धमकावून निघून गेले असल्याची देखील कबुली दिली. त्याबाबतचा गुन्हा दाखल
आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली,
पोलीस निरीक्षक राजेश गवळी व पथक शाहुपूरी पोलीस ठाणे, कडील पो.हे.कॉ ऋषीकेश पवार, युवराज पाटील, मिलिंद बांगर, लखन पाटील, सागर माने,
शुभम संकपाळ, सुशील सावंत, दिग्विजय चौगले यांनी केली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास स्मिता पाटील, स.फौ. प्रकाश भंडारे, पो.कॉ. निलेश नाझरे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *