पोलीसांनी अवघ्या आठ तासात निर्घृण खुनाचा केला उलघडा स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा, कोल्हापूर, पथक इचलकरंजी यांची विशेष कारवाई.

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 19 Second

विशेष वृत्त : मार्था भोसले

इचलकरंजी दि २४
सकाळी ०९.३० वा चे दरम्यान अज्ञात व्यक्तीचा खुन झाल्याची वर्दी शहापूर पोलीस ठाण्यास मिळताच घटनास्थळी पोलीस फोजपाटयासह पोचली प्राईड इंडिया ते सांगले मळा जाणारे शेतातील कच्च्या
रोडवर, तारदाळ येथे इसमनामे संदिप शांताराम गट्टे,वय-३२,रा.अमिन सायकल दुकान, धनगर
माळ, कोरोची, ता.हातकणंगले, जि. कोल्हापूर याचा अज्ञात इसमांनी खुन
केल्याने निष्पन्न झाले, काही दिवसांपूर्वीच एक खुन झाल्यामुळे पोलीसांच्या पुढे खुन्यांना पकडुन अटक करणे आव्हानात्मक होते.
सदर गुन्हा उघडकीस आणणेबाबत मा.पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी
सुचना व मार्गदर्शन केले होते.
वरीष्ठ यांनी दिले सुचनांप्रमाणे
शहापूर पोलीस ठाणे गुरनं २६९/२०२१ भा.दं.वि.सं.क.३०२ प्रमाणे गुन्हा
दाखल करून
पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सपोनि किरण
भोसले स्था.गु.अ.शा. कोल्हापूर यांचे अधिपथ्याखाली गुन्हे शाखेची दोन पथके आरोपीचा शोध
घेण्यासाठी इचलकरंजी शहरात व आजूबाजुस रवाना केली होती.

मयत व्यक्तीची फोटो

आरोपीचा शोध घेत असताना
सहाय्यक पोलीस निरीक्षक, किरण भोसले यांचे पथकास गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी
मिळाली की, सदर गुन्हयातील संशयीत आरोपी हे वडगांव बाजार समिती गेट समोर येणार
असल्याची माहिती मिळाली होती.

त्या प्रमाणे अवघ्या आठ तासांत गुन्हे शाखेकडील पथकाकडून सापळा रचून
गुन्ह्यातील संशयित आरोपी १) आनंदा उर्फ लाल्या कुमार सुतार, वय-२१, रा.धनगर माळ,
कोरोची, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर, २) अनिकेत विजय शिंदे,वय-२२,रा.विवेकानंद नगर,
कोरोची ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर यांना ताब्यात घेवून त्यांचेकडून गुन्हयाच्या अनुषंगाने
विचारपुस केली असता,
यातील मयत व आरोपी नामे आनंदा उर्फ लाल्या कुमार सुतार याच्या
आर्थिक देवाण घेवाणीतून संशयीत आरोपी यांनी कुराडी सारख्या हत्याराने डोकीत वार करून
खुन केल्याची त्यांनी कबुली दिली.
आरोपींना पुढील तपासकामी शहापूर पोलीस ठाणे यांचे
ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री शैलेश बलकवडे सो,
अपर पोलीस
अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड मॅडम व उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी विभाग
श्री.बी.बी.महामुनी यांचे मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक
प्रमोद जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक, किरण भोसले, पोलीस अमलदार संजय इंगवले, सुरज
चव्हाण,रणजित पाटील, अमर शिरढोणे, प्रशांत कांबळे, बालाजी पाटील, आयुब गडकरी,
संभाजी भोसले, बबलू शिंदे, फिरोज बेग, असिफ कलायगार, चालक यशवंत कुंभार यांनी तसेच
सायबर पोलीस ठाणेकडील विक्रम पाटील व सचिन बेडखळे यांनी केली आहे.

___________________________________________
____________________जाहीरात_______________

जाहीरात साठी संपर्क साधा जावेद देवडी 9021148696

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *