वडगाव पोलसांची बेधडक कामगिरी, व्यापा-यास पाच लाखांची खंडणी मागणा-या आरोपीस शिताफीने केली अटक

विशेष वृत्त : जावेद देवडी

वडगाव पोलसांची बेधडक कामगिरी, शहरातील व्यापा-यास पाच लाखांची खंडणी मागणा-या
आरोपीस शिताफीने केली अटक

Advertisements

वडगांव पोलीस ठाणे गु.र.नं.573/2021 भा.द.वि.स.क.384 प्रमाणे गुन्हा दाखल.

वडगाव शहरातील व्यापाऱ्यास आरोपी याने 5 लाख रुपयेची खंडणीची मागणी करुन पैसे न दिलेस
जवळ असलेले बदनामीकारक फोटो व्हायरल करणेची धमकी दिली होती.

सदर गुन्हयांचे तपासाबाबत संतोष घोळवे पोलीस निरीक्षक वडगांव पोलीस ठाणे यांनी पोलीस
ठाणेकडील पथकातील कर्मचारी यांना योग्य त्या सुचना देवुन अज्ञात आरोपींचा शोध घेणेबाबत आदेशीत
केले होते.

त्याप्रमाणे सदर गुन्हयांचा सखोल तपास करुन तसेच गोपनिय बातमीदारामार्फत व तांत्रीक तपासादवारे
कमलाकर यशवंत मुळे वय 33 रा.मुळ मंगळवार पेठ, जि.सातारा, सध्या हनुमान मंदीर जवळ वडगांव
ता.हातकणंगले, जि.कोल्हापुर यांस ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयांचे अनुशंगाने चौकशी केली असता,
आरोपी याने कर्जबाजारपणाला कंटाळुन सदरचे कृत्ये केलेबाबत कबुली दिली. आरोपी याचे ताबेतुन गुन्हयांत
वापरलेला 5000/-रुपये किंमतीचा मोबाईल हॅण्डसेट हस्तगत करणेत आलेला असुन पुढील गुन्हयांचा तपास
अर्चना पाटील या करीत आहेत.
सदरची कारवाई शैलेश बलकवडे , पोलीस अधिक्षक, कोल्हापुर, जयश्री गायकवाड ,
अप्पर पोलीस अधिक्षक गडहिंग्लज कॅम्प इचलकरंजी, मा.रामेश्वर बैंजने, उपविभागीय पोलीस अधिकारी,
जयसिंगपुर विभाग, तसेच पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस नाईक जावेद रोटीवाले, योगेश राक्षे, संदीप गायकवाड, प्रमोद चव्हाण, रणविर जाधव, विकी भंडारे, सतिश सुतार यांचे पथकाने कारवाई केली.

———————–जाहीरात———————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *