Share Now
Read Time:1 Minute, 3 Second
मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जावेद देवडी/प्रतिनिधी) – लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी रूट मार्च केला.
यावेळी लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील लक्षतीर्थ वसाहत, ससुर बाग, महात गल्ली, महाराणा प्रताप चौक, अकबर मोहल्ला, घिसाड गल्ली, शनिवार पेठ आणि सिद्धार्थनगर या ठिकाणी रविवारी (दि. २०) सायंकाळी दरम्यान रूट मार्च घेण्यात आला. सिद्धार्थनगर येथे या रूट मार्चचा समारोप करण्यात आला.

प्रेरणा कट्टे उपविभागीय पोलिस अधिकारी शहर विभाग, पोलिस निरीक्षक बाबर, पीएसआय भोसले आणि 158 पोलीस कर्मचारी आणि पोलिस वाहने इत्यादी.सहभागी झाले होते.
Share Now