Sangli: पन्नास हजारापेक्षा अधिक रक्कम बाळगल्यास त्याचे पुरावे सोबत ठेवा – जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी जिल्ह्यात मतदान होत आहे. या निवडणूकीच्या प्रचाराचा कालावधी दिनांक 21 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 6 वाजता समाप्त होत असून या दरम्यान निवडणूक तपासणीसाठी विविध ठिकाणी कार्यरत असणाऱ्या स्थिर सर्वेक्षण व भरारी पथकाद्वारे नागरिक व वाहनांची कसून तपासणी होणार आहे.

या कालावधीमध्ये नागरिकांनी त्यांच्याजवळ 50 हजार रूपयापेक्षा जास्त रक्कम रोख स्वरुपात बाळगल्यास त्या रोख रक्कमेच्या स्त्रोताविषयाचे पुरावे सोबत ठेवणे आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

Advertisements

तसेच एखाद्या विशिष्ठ उमेदवारास मतदान करण्यासाठी किंवा न करण्यासाठी लाच देणे किंवा मतदान करण्यासाठी किंवा न करण्यासाठी मतदारावर दहशत किंवा धाकदपटशाचा मार्ग अवलंबणे हा नुसता निवडणूक गुन्हा नसून भारतीय दंडसंहिता कायद्यानूसार दंडनिय अपराध आहे. त्यामुळे अशा गैरकृत्यापासून दूर राहण्याची सर्व नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *