मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्या जाहीर कार्यक्रमानुसार सांगली जिल्ह्यातील 44-सांगली लोकसभा व 48-हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे मतदान दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी आहे. ही निवडणूक विना अडथळा व भयमुक्त वातावरणात आणि निष्पक्षपातीपणे पार पडण्याच्या दृष्टीकोनातून बाहेरच्या मतदार संघातून आणलेले राजकीय कार्यकर्ते, पक्ष कार्यकर्ते, सभेचे कार्यकर्ते, प्रचार कार्यकर्ते कि जे या मतदारसंघातील मतदार नाहीत
अशा व्यक्तिंना राहण्यास निवडणूक प्रशासन / पोलीस प्रशासन यांनी प्रतिबंध करावा. अशा भारत निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करण्यासाठी खालीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार जिथे असे कार्यकर्ते ठेवले आहेत आणि बाहेरील कार्यकर्ते यांना या परिसरामध्ये सामावून घेतले आहेत की नाही हे शोधून काढण्यासाठी कल्याण मंडप / कम्युनिटी हॉल इत्यादीची तपासणी करावी. त्यांच्या वास्तव्याचा मागोवा घेण्यासाठी लॉज आणि गेस्टहाऊसची तपासणी करावी. मतदारसंघाच्या हद्दीवरील चेक-पोस्टस बसवावेत आणि मतदारसंघाच्या बाहेरून येणाऱ्या वाहनांच्या हालचालीवर लक्ष ठेवावे.