Sangli: मतदान केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश जारी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक मतदान दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी होणार आहे. जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, शांतता रहावी. तसेच कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकारानुसार सर्व मतदान केंद्राच्या इमारतीपासून 200 मीटर सभोवतालच्या परिसरात दिनांक 23 एप्रिल 2019 रोजीच्या सकाळी 06.00 वाजल्यापासून ते सायंकाळी 20.00 वाजेपर्यंत या कालावधीसाठी मनाई आदेश जारी केला आहे.

या आदेशानुसार दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना गटागटाने फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई करण्यात आली आहे. झेरॉक्स मशिन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक या संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली आहे. मतदान केंद्रात मोबाईल, पेजर नेण्यास मनाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *