Getting your Trinity Audio player ready...
|
विशेष वृत्त : कौतुक नागवेकर
सांगली दि, ३ हरिपूर रोड येथे ऊसाने भरलेला ट्रॅक्टर ने अन्वेशा निर्भय विसपुते वय वर्ष १२ राहणार हरिपूर या बालिकेला ट्रॅक्टरने चिरडले व तिच्या डोक्यावरून चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
चिमुकली निष्पाप अन्वेशा निर्भय विसपुते हिचा दिनांक ३०/११/२०२१ रोजी उसाने भरलेल्या ट्रॅक्टर खाली येऊन मृत्यू झाला. तिला व त्याच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांना महिला बाल कल्याण सभापती गीतांजली ढोपेपाटील, नगरसेविका उर्मिला बेलवलकर , नगरसेविका सविता मदने, यांच्या तर्फे निवेदन देण्यात आले.
यावेळी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सिंदकर यांनी निवेदन स्वीकार ट्रॅक्टर चालक याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे घटनास्थळी ट्रॅक्टर चालकच्या सांगण्यावरून रोडवर मातीचा डिगा मुळे ताबा सुटून अपघात झाला त्याचाही तपास करत संबंधित महानगरपालिकांच्या ठेकेदार त्याच्यावरही कारवाई करण्यात येणार असून योग्य तो तपास करूनच संबंधितांच्यावर खडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले,
यावेळी निवेदन देताना अ.भा. वि.प. च्या सर्व पदाधिकारी व अवधूत नलवडे,रोहन भोरावत,रोहन कोडवले,बाहुबली छत्रे,माधुरी लड्डा, उत्तरा पुजारी उपस्थित होते.