विशेष वृत्त : अजय शिंगे
कोल्हापूर ता.06 :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महानगरपालिकेच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपआयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त विनायक औंधकर, संदीप घार्गे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, सहा. संचालक नगररचना रामचंद्र महाजन, जल अभियंता अजय साळोंखे, उपशहर अभियंता नारायण भोसले, एन.एस.पाटील, नगरसचिव सुनिल बिद्रे, परवाना अधिक्षक राम काटकर, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्राबंरे, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.