मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (शरद माळी/प्रतिनिधी) – कोल्हापूर लोकसभा निवडणूक २०१९च्या पूर्व संध्येला सोशल मीडियावर आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या सही आणि नावाच्या पत्राने अनेकांना संभ्रमात टाकले आहे. त्यामुळे यासंदर्भात सत्य सांगत आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी ‘ज्याने’ कुणी माझ्या नावाचा गैरवापर केला असून तयार केलेल्या पात्राद्वारे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करून चुकीचा राजकीय संदेश पसरवला आहे. याविरुद्ध पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी पत्राद्वारे २२ एप्रिल २०१९ रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे केली आहे. यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारे ‘ते पत्र माझे नव्हेच’, हे आता स्पष्ट झाले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील याच्या नावाच्या लेटरहेडच्या साहाय्याने आणि सहीचा वापर करून आघाडीधर्म पळून कोल्हापूर लोकसभा निवडणूक २०१९ साठी रिंगणात उतरलेल्या धनंजय महाडिक यांना मतदान करावे, असा संदेश देऊन ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. पसरविण्यात आलेल्या पत्रावर कोणतीही तारीख नव्हती. तसेच कार्यकर्ते आणि हितचिंतक यांना आवाहन केले होते. त्यामुळे अनेकजण आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या भूमिके संदर्भात संभ्रमात पडले.

मतदानाच्या पूर्वसंध्येला हा प्रकार घडल्याने परिसरात हा चर्चेचा विषय झाला होता. याबाबत आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी वेळीच शाहूपुरी पोलीस ठाण्यात सोशल मीडियावर व्हायरल होणारे पत्र माझे नसून त्या पत्राचा आणि माझा कसलाही संबंध नसून ते पत्र खोटे आहे. त्यामुळे असे पत्र तयार करून निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी पत्राद्वारे २२ एप्रिल २०१९ रोजी केली आहे.
याबाबत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या संदर्भात आम्हाला अर्ज प्राप्त झाला असून याची चौकशी करून यौग्य ती कारवाई करण्यात येईल.