Sangli : सांगली लोकसभा मतदारसंघात सरासरी 64 टक्के मतदान

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूक 2019 साठी तिसऱ्या टप्प्यात 44 – सांगली लोकसभा मतदारसंघात आज अंदाजे सरासरी 64 टक्के मतदान झाले. मतांचा अंतिम ताळेबंद लागल्यावर यात वाढ अथवा घट होऊ शकते, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

44 सांगली लोकसभा मतदारसंघात सर्वत्र शांततेत व उत्साहात मतदान झाले. मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ असून, 18 लाख, 3 हजार 54 मतदार आहेत. आज झालेल्या मतदानावेळी मतदारांसाठी मेडिकल किट, पाळणाघर, दिव्यांग मतदारांसाठी रँप, व्हीलचेअर, ने-आण आदि सुविधा मतदान केंद्रावर उभारण्यात आल्या होत्या. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत नियोजनपूर्वक मतदान प्रक्रियेची जबाबदारी पार पाडली.

Advertisements

आज रात्रीपासूनच ठिकठिकाणहून मतदानयंत्रे संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा होतील आणि तेथून सेंट्रल वेअर हाऊस, मिरज (जिल्हा क्रीडा संकुलच्या मागे) येथे कडेकोट पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात येतील. दि. 23 एप्रिल रोजी 12 उमेदवारांचे भवितव्य यंत्रबंद झाले आहे. मतमोजणी दि. 23 मे 2019 रोजी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *