कोल्हापूर/प्रतिनिधी: शिवाजी विद्यापीठात प्रोग्रामर आणि डेव्हलपर पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी २७ जानेवारी २०२२ रोजी थेट मुलाखत आणि प्रॅक्टीकलच्या आधारे उमेदवारांची निवड केली डाणार आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासकीय विभागात विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यात येणार आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या पदभरती अंतर्गत प्रोग्रामर (Programmer), डेव्हलपर, सिस्टम (Developer, System) सॉफ्टवेअर प्रोग्रामर (Software Programmer) पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. थेट मुलाखतीतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २७ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. संबंधित अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या पत्त्यावर दिलेल्या वेळेत मुलाखत होणार आहे. अनुभवी आणि पात्र उमेदवारांनी आपली कागदपत्रे मुलाखतीच्या दिवशी १०.३० वाजण्यापुर्वी संचालकांकडे सादर करणे गरजेचे आहे.
२७ जानेवारी रोजी प्रोग्रामर/डेव्हलपर पदासाठी थेट मुलाखती आणि प्रात्यक्षिक परीक्षा होतील. निवड झालेल्या उमेदवारांना गोपनीयतेबाबत बंधपत्र द्यावे लागेल. मुलाखतीला येण्यापुर्वी उमेदवारांनी पदभरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.