कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या का केली? महत्त्वाची माहिती आली समोर…!

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 20 Second

प्रसाद शिंगे विशेष/प्रतिनिधी,बेंगळुरू: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची नात सौंदर्या नीरज ही आज बेंगळुरू वसंतनगरातील निवासस्थानी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सौंदर्याचा मृतदेह आढळला असून शवविच्छेदन अहवालानंतर इतर बाबी स्पष्ट होणार आहेत. दरम्यान, सौंदर्याला चार महिन्यांचे बाळ असून गर्भावस्थेत असल्यापासूनच ती डिप्रेशनमध्ये होती व त्यातूनच तिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सौंदर्या ही येडियुरप्पा यांची मोठी मुलगी पद्मा हिची मुलगी होती. पेशाने डॉक्टर असलेली सौंदर्या एम. एस. रामैया रुग्णालयात सेवा देत होती. २०१९ मध्ये डॉ. नीरज यांच्याशी तिचा विवाह झाला होता. या दाम्पत्याला चार महिन्यांचे मूल असून आजच्या घटनेने संपूर्ण कुटुंब हादरलं आहे. आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास सौंदर्या तिच्या रुममध्ये मृतावस्थेत आढळली. पंख्याला लटकलेल्या अवस्थेत ती होती. याबाबत पती नीरज यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आहे. प्रथमदर्शनी ही आत्महत्या दिसत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. सौंदर्या गर्भावस्थेत असल्यापासूनच डिप्रेशनमध्ये गेली होती. तिच्यावर उपचारही सुरू होते. ती या स्थितीतून बाहेर यावी, यासाठी येडियुरप्पा अनेकदा दौऱ्यावर तिला सोबत न्यायचे. थोडी इतरांत मिसळल्यास ती सावरेल यासाठी त्यांनीही प्रयत्न केले. तिच्या या स्थितीबाबत कुटुंबीय आणि संपर्कातील सर्वांनाच माहिती होती, असे ज्ञानेंद्र यांनी नमूद केले. सौंदर्याचे पती नीरज हा भला माणूस आहे. या दाम्पत्याला मी अनेकदा भेटलो आहे. त्यांच्यात कोणताही तणाव नव्हता. सौंदर्या डिप्रेशनमध्ये असल्याने त्याचीच चिंता सर्वांना होती, असेही ते म्हणाले. नातीच्या निधनाने येडियुरप्पा यांना मोठा धक्का बसला असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई तसेच मंत्रिमंडळातील त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी येडियुरप्पा यांची भेट घेऊन सांत्वन केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *