Share Now
कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन आणि कार्याचा प्रचार आणि प्रसार या कार्यात सलग तेरा वर्षे कार्यरत असलेल्या शाहू छत्रपती फौंडेशनने शाहूंच्या विचारांचा वसा आणि वारसा जोपासला आहे. ‘राजर्षी’ दिनदर्शिका हे त्याचे ज्वलंत उदाहरण असल्याचे गौरवोद्गार शाहू ग्रुपचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांनी येथे बोलताना केले. शाहू छत्रपती फौंडेशनच्या वतीने निर्मित ‘राजर्षी’ या दिनदर्शिकेचे प्रकाशन राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते कागल हाऊस येथे झाले. युवा नेते दौलत देसाई, भाजपचे कागल तालुकाध्यक्ष असिफ मुल्ला, शहराध्यक्ष सुशांत कालेकर, तालुका उपाध्यक्ष उमेश कोरवी, राजू माणगावे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. फौंडेशनचे संस्थापक जावेद मुल्ला आणि ‘ राजर्षी’ दिनदर्शिकेचे समन्वयक नवाब शेख यांनी फौंडेशनच्या गेल्या तेरा वर्षातील कार्याची माहिती दिली. असिफ मुल्ला यांनी आभार मानले.
Share Now