माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त लक्षतिर्थ वसाहमध्ये आयोजित विविध स्पर्धांना महिलांचा प्रतिसाद

कोल्हापूर/प्रतिनिधी: माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त लक्षतिर्थ वसाहतमध्ये भागीरथी महिला संस्थेच्यावतीनं, रांगोळी स्पर्धेसह विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला.

भागीरथी महिला संस्थेच्या सदस्या शिवानी पाटील यांच्या पुढाकारानं, लक्षतिर्थ वसाहतमध्ये रांगोळीसह विविध स्पर्धा घेण्यात आल्या. माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या स्पर्धांमध्ये, महिला वर्ग मोठया संख्येनं सहभागी झाला होता. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून न्यू हायस्कूलचे कलाशिक्षक संजय पाटील यांनी काम पाहीलं. स्पर्धेचं बक्षिस वितरण उत्साहात करण्यात आलं. यावेळी प्राजक्ता शिंदे, अश्विनी पाटील, राधिका पाटील, सुशीला सुतार यांच्या हस्ते विजेत्या महिलांना बक्षिसं देण्यात आली. यावेळी सुषमा पाटील यांच्यासह भागीरथीच्या सदस्या आणि स्पर्धक महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *