कोल्हापूर महापालिका निवडणूक २०२२ प्रारुप प्रभाग रचना आराखडा आज प्रसिद्ध

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ प्रारुप प्रभाग रचना आराखडा आज प्रसिद्ध झाला. त्यामुळे कोल्हापुरातील निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना आता वेग येणार आहे. ही यादी कोल्हापूरातील चार विभागीय कार्यालयात तसेच ऑनलाईन पाहता येणार आहे. कोमनपा सार्वत्रिक निवडणूक २०२२ 

http://kolhapurcorporation.gov.in

या लिंकवर क्लिक करून प्रभागांचे प्रारूप प्रभाग रचना पाहता येतील. यात प्रभाग ३१ आणि नगरसेवकांची संख्या ९२ असे याचे स्वरूप आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ऑनलाईन यादी पाहण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. 

कोल्हापूर महानगरपालिकेने १५ जानेवारी रोजी प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा निवडणूक आयोगाला पाठवला होता. त्याला आयोगाने मान्यता दिली असून आज मंगळवार  ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची मुदत १५ नोव्हेंबर २०२१ रोजी संपली आहे. मात्र, कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता मात्र निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना आता वेग येणार आहे.

अशी असेल प्रक्रिया-

१ फेब्रुवारी – प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध

१४ फेब्रुवारी -१४ फेब्रुवारी पर्यंत हरकती दाखल करता येणार 

१६ फेब्रुवारी – निवडणूक आयोगाकडे हरकतींचा अहवाल सादर करणार २६फेब्रुवारी – हरकतींवर सुनावणी होणार 

२ मार्च – निवडणूक आयोगाकडे अंतिम अहवाल

 ४ मार्च -अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार 

७ मार्च – प्रारूप मतदार यादीची प्रक्रिया सुरू

या लिंकवर यादी पाहू शकता…..

http://kolhapurcorporation.gov.in

#कोल्हापूर_महानगरपालिका

#Kolhapurwards

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *