भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश, कोव्हीडच्या प्रतिबंधासाठी जिल्हा आरोग्य विभागाला ३० कोटी रूपयांचा निधी मंजुर..!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:4 Minute, 51 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी :भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश, कोव्हीडच्या प्रतिबंधासाठी जिल्हा आरोग्य विभागाला ३० कोटी रूपयांचा निधी मंजुर, सीपीआर, आयजीएम आणि गडहिंग्लज रूग्णालयाच्या उपचार यंत्रणेला मिळणार बळकटी

भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. कोव्हीडच्या तिसर्‍या लाटेच्या प्रतिबंधासाठी जिल्हा आरोग्य विभागाला ३० कोटी रूपयांचा निधी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मंजुर केला आहे. या निधीतून सीपीआर, आयजीएम आणि गडहिंग्लज रूग्णालयांना लहान मुलांसाठी बेडची उपलब्धता, जनरल आयसीयू आणि सीपीआरसाठी आरटीपीसीआर तपासणी मशिन उपलब्ध होणार आहे. या रूग्णालयांना निधी उपलब्ध झाल्याने जिल्हयाची आरोग्य यंत्रणा सक्षम बनेल, असा विश्‍वास धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार गेल्या महिन्यात कोल्हापूर दौर्‍यावर आल्या होत्या. त्यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांनी, त्यांची भेट घेवून कोल्हापुरातील सीपीआर आणि उपजिल्हा रूग्णालयांसाठी कोव्हीड तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य सुविधांसाठी निधी देण्याची मागणी केली होती. त्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांच्याकडे पाठपुरावाही सुरू ठेवला होता. या पाठपुराव्याला यश आले असून, मंत्री पवार यांनी, कोव्हीडच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणेला ३० कोटी रूपयांचा निधी मंजुर केल्याचे महाडिक यांना कळवले आहे. दरम्यान आरोग्य विभागाला केंद्र शासनाकडून ३० कोटी रूपयांचा निधी मंजुर झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांनी सांगितले. या निधीतून १० किलो लीटर लिक्वीड मेडिकल ऑक्सिजनचे चार प्लँट उभारण्यात येणार आहेत. तसेच आयजीएम आणि सीपीआर रूग्णालयामध्ये लहान मुलांसाठी प्रत्येकी ४२ बेड, तर गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयासाठी ३२ बेडची सुविधा होणार आहे. त्याचप्रमाणे आयजीएम आणि गडहिंग्लज या रूग्णालयांसाठी प्रत्येकी ४२ बेडचे आयसीयू बेड उपलब्ध होणार आहेत. तर सीपीआरसाठी एक अत्याधुनिक आरटीपीसीआर स्वॅब तपासणी मशिन मंजुर झाले आहे. या मशिनमुळे आता कोल्हापूर जिल्हयातील सर्व स्वॅबची कोल्हापुरातच तपासणी होणार आहे. त्यामुळे यंत्रणेच्या वेळ आणि पैशाची बचत होणार आहे.

निधीच्या ३० कोटी रूपयांतून हा खर्च करण्यात येणार असून, निधी शिल्लक राहिल्यास, त्यातून औषधे खरेदी करण्यात येणार आहेत. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार खरेदी प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांनी सांगितले. जिल्हयाला ३० कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाल्याने, जिल्हयाची आरोग्य यंत्रणा सक्षम होणार आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे धनंजय महाडिक यांनी आभार मानले आहेत. सीपीआर रूग्णालयात अत्यावश्यक सुविधा, डॉक्टर आणि अन्य मनुष्यबळाची उपलब्धता होण्यासाठी यापुढेही आपण पाठपुरावा करणार असल्याच धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केले.   

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *