११ फेब्रुवारीला ‘जिंदगानी’तुन नवोदित अभिनेत्री वैष्णवी शिंदे हीच पदार्पण

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 37 Second

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क

मानव हा नेहमीच कळत नकळत निसर्गाचं शोषण करत असतो आणि याच विषयाला घेऊन जिंदगानी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नवोदित अभिनेत्री वैष्णवी शिंदे म्हणते “ हा चित्रपट माझ्या फार जवळचा आहे. एका गावाची कथा आणि व्यथा आम्ही मदत असून पहिलाच सिनेमा तो हि सामाजिक विषया वर करताना काहीस दडपण होत पण ते माझे सहकलाकार आणि जेष्ठ कलाकार शशांक शेंडे यांनी दूर केल”. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाविषयी वैष्णवी सांगते “मराठी प्रेक्षक हा फार सुजाण आहे आणि अनेक सामाजिक चित्रपटांना मराठी प्रेक्षकांनी नेहमीच उत्तम प्रतिसाद दिला आहे. आमच्या चित्रपटाचा ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद हा हा अतुलनीय आहे”.

सामाजिक चित्रपटाच्या निमित्ताने अनेकदा शशांक शेंडे यांच्या कामाचं कौतुक झालं आहे, जागतिक कीर्तीच्या कलाकारांसोबत वैष्णवी शिंदे पहिल्यांदाच काम करत असून तिचा हा पहिलाच चित्रपट आहे या अनुभवाविषयी ती सांगते “शशांक शेंडे हे फार मोठे कलावंत आहेत, कलाकार म्हणून मोठं होत असताना त्यानी अनेक नवोदित कलाकारांना मार्गदर्शन केलं आहे आणि मी ही त्यातलीच एक आहे. जिंदगानीच्या निमित्ताने त्यांच्या सोबत स्क्रीन शेयर करत असताना मला त्यांच मार्गदर्शन मिळालंच पण त्याच बरोबर जागतिक कीर्ती असताना सुद्धा आपण जमीन कस राहावं आपल्यातली नम्रता गमावू नये याची चांगलीच शिकवण मला त्यांनी दिली.”अभिनय करेन अस कधी वाटलं नव्हतं आणि अभिनयाच्या बाबतीत थोडी भीती होती पण दिग्दर्शक आणि सहकलाकाराच्या मदतीने त्यावर मी मात केली. शशांक शेंडे यांच्यामुळे अभिनयाचे विविध पैलू मला कळलेच पण त्याचबरोबर आपण अभिनेत्री म्हणून काय करायला हवं हे सुद्धा मला कळू लागलं आहे.” असं वैष्णवी आपल्या पहिल्याच अभिनय पदार्पणाविषयी सांगते. येत्या ११ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत असून या चित्रपटाची सुनीता शिंदे यांच्या नर्मदा सिनेव्हीजन्सची ही निर्मिती आहे. या चित्रपटाचं संकलन निलेश गावंड, संगीत विजय गवंडे यांनी केले असून चित्रपटातील गाणी प्रशांत मडपूवार याने लिहिली आहेत तर आदर्श शिंदे, बेला शेंडे, अजय गोगावले, राधिका अत्रे आणि अमिता घुगरी यांच्या स्वरांनी चित्रपटातील गाणी सजली आहेत.

=====जाहिरात===👇=जाहिरात=👇=====जाहिरात=====

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *