पालकमंत्री सतेज पाटील त्यांचा कोटयावधी रूपयांचा फाळा भरत नाहीत, तोपर्यंत कोल्हापुरच्या नागरिकांनी एक रूपयाही घर फाळा भरु नये,

कोल्हापूर दि. ४ पालकमंत्री सतेज पाटील त्यांचा कोटयावधी रूपयांचा फाळा भरत नाहीत, तोपर्यंत कोल्हापुरच्या नागरिकांनी एक रूपयाही घर फाळा भरु नये, असे आवाहन माजी महापौर सुनील कदम आणि माजी नगरसेवक सत्यजीत कदम यांचे आवाहन : पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कुटुंबाने वीस कोटी हुन अधिक रकमेचा महसूल बुडवल्या चा कदम बंधुंचा आरोप पालकमंत्री सतेज पाटील आणि त्यांच्या कुटुंबाने राज्य शासन आणि कोल्हापूर महापालिकेचा २० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा महसूल बुडवला आहे. जोपर्यंत ते हा महसूल भरत नाहीत ,तोपर्यंत कोल्हापूरच्या नागरिकांनी महापालिकेचा एक रूपयादेखील कररूपाने भरू नये ,असे आवाहन माजी महापौर सुनील कदम आणि माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत बोलताना केले. आज अखेर पालकमंत्री सतेज पाटील आणि त्यांच्या कुटुंबाने राज्य शासन आणि कोल्हापूर महापालिकेचा वीस कोटी रूपयाहून अधिक रकमेचा कर बुडवल्याचा गंभीर आरोप कदम बंधुनी यावेळी बोलताना केला. त्यांच्या या आरोपामुळे शहरात खळबळ उडाली आहे. कोल्हापूर प्रेस क्लब येथे झालेल्या या पत्रकार बैठकीत कदम बंधूनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकड़ून कोल्हापूर महापालिकेत दड़पशाहीचे राजकारण सुरु असल्याचा आरोप करण्यात आला.
केवळ आपण राज्य शासन आणि कोल्हापूर महानगरपालिकेत पाठपुरावा केल्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांना त्यानी बुडवलेल्या २० कोटी रुपयापैकी जवळपास साडेचार कोटी रुपये महसूल भरावा लागला ,असा दावा यावेळी कदम बंधुनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *