Share Now
Read Time:1 Minute, 16 Second
कोल्हापूर/प्रतिनिधी: महात्मा फुलेनी देवाचे अस्तित्व नाकारले नाही. ‘निर्मिक’ रुपातील देव त्यानी मानला. पण देव आणि देवाला माननारे यामध्ये दलालाची भूमिका बजावणाऱ्या घटकाला त्यानी नाकारले. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ जी पी माळी यानी येथे बोलताना केले.प्रबोधन सेवा संस्थेच्या कदमवाड़ी शाखेच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
‘ देव, धर्म आणि महात्मा फुले ‘ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी निवृत्त कृषी अधिकारी संभाजी यादव हे होते सुसंस्कार शिक्षण मंडळ संस्थापक एम एच मगदुम ,घोड़ावत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ भगवान हिरडेकर, ज्येष्ठ साहित्यिक जी पी शिंदे, यांच्या प्रमुख उपस्थितीत हे व्याख्यान झाले.
Share Now